आणि कोकण दरवाज्याने सुटकेचा श्वास घेतला…….
 |
| रतनगडावरची पहाट |
रतनगड… सह्याद्री मधलं
रत्नचं !!! रत्न कारण हिरा जसा कोंदणात बसवतात तसाच रतनगड कोंदणात बसवलेला
सह्याद्रीचा हिराचं आहे…. चारही बाजूंनी सह्याद्रीचे जे सौंदर्य दिसते
त्याला शब्दही कमी पडतात स्पष्टीकरण द्यायला.
 |
| रतनगडावरून कात्राबाई करंडा घाट गुहीरीचे दार आणि आजोबा पर्वत |
रतनगड चारही बाजूंनी
वेगवेगळ्या किल्ल्यांनी आणि सह्याद्रीच्या रौद्र कड्यांनी व्यापलेला आहे,
रतनवाडी हे पायथ्याला असलेले एक गावं, ह्या गावामध्ये 'अमृतेश्वर
मंदिर' आहे अतिशय सुंदर आणि खास भेट द्यावी असे हे मंदिर. मंदिराचे बांधकाम
अतिशय सुंदर आणि विलोभनीय आहे, विलोभनीय एवढे कि छायाचित्रकारांची तुंबळ
उडते छायाचित्रण करायला आणि कितीही चित्रीकरण केले तरी मन मात्र भरत नाही….
एकदा तरी भेट देऊन बघाच !!!!
रतनगडावर ३ दरवाजे आहेत, त्यातला पहिला म्हणजे गणेश दरवाजा जो
रतनवाडीवरून गडावर गेले कि समोर दिसतो, दुसरा त्रंबक दरवाजा ह्या दरवाज्या
बद्दल बऱ्याच जणांना गैरसमज आहे कि हा कल्याण दरवाजाच आहे पण हा त्रंबक
दरवाजा आहे जो अलंग मदन कुलंग ह्या त्रिकुटाच्या अगदी समोर आहे साम्रड
नावाचे एक गाव आहे तिथून एक वाट ह्या दरवाज्याला येउन मिळते तसेच दुसरी एक
वाट ह्या दरवाज्याला येउन मिळते ती म्हणजे साकुर्ली गावातून 'बाण' नावाचा
कडा आहे त्याच्या अगदी पोटातून म्हणजेच नळीतून एक वाट ह्या दरवाज्याला येउन
मिळते पण हि वाट फारच बिकट आणि कठीण आहे, ज्याला सह्याद्रीची माहिती नाही
त्याने सह्याद्रीच्या वाट्याला जाऊ नये ह्याचा प्रत्यय ह्या वाटेवर अगदी
प्रत्येक क्षणाला येतो. आयुष्यात एकदाच ह्या वाटेने गेलो आणि ठरवलं परत
ह्या वाटेत हात टाकायचा नाही.
 |
| कोकण दरवाज्यातून कात्राचे अजस्त्र कडे छायाचित्रीत करताना मी स्वतः !!! |
आणि आता राहिला तिसरा आणि शेवटचा दरवाजा तो म्हणजे कोकण दरवाजा उर्फ कल्याण
दरवाजा, ह्या दरवाज्याला येणाऱ्या पायऱ्या नामशेष झाल्या आहेत. कशा झाल्या
आणि कोणी केल्या हे विचारू नका, उत्तर मलाही माहित नाही. कोकण दरवाज्याला
येण्या साठी दोन वाटा आहेत दोनही अतिशय बिकट आणि कठीण आहेत कारण चढायला
किव्वा उतरायला म्हणा पायऱ्या नाहीत, प्रस्तरारोहणाशिवाय पर्याय नाही.
 |
| प्रस्तरारोहण(rappelling) करताना अनिकेत आणि मदतीचा हात(Belay) देणारे विशाल आणि विक्रम |
येणाऱ्या दोन वाटा ह्या वेगवेगळ्या गावातून वर येतात पहिले गाव म्हणजे
साम्रड, साम्रड गावातून जी वाट त्रंबक दरवाज्याला मिळते त्याचं वाटेने पुढे
येउन त्रंबक दरवाजा न चढता कड्याला वळसा घालून सरळ पायवाटेने कोकण
दरवाज्यापाशी पोहोचता येते, ह्या वाटेने संपूर्ण रतनगड अतिशय सुंदर दिसतो.
आणि दुसरे गाव व्हरपडी किव्वा डेहेणे, ह्या गावातून एक वाट कात्राबाई ह्या
कड्याच्या अगदी शेजारून वर येते परंतु हि वाट अतिशय फसवी आणि अवघड आहे.
माहिती असेल तरच ह्या वाटेने जावे असा माझा वैयक्तिक सल्ला सर्वांना आहे,
बरेच जण ह्या वाटेला 'बारा पायरीची वाट' असे संबोधतात परंतु हि वाट अतिशय
जुनी कोकण दरवाज्याची वाट आहे. बारा पायरीची वाट हि आजोबा पर्वताला
जाणाऱ्या वाटेला म्हणतात, हे स्पष्टीकरण मला व्हरपडी, डेहेणे, खोबऱ्याची
वाडी आणि गुंडे येथील स्थानिक्कानी दिल.
 |
कृणाल आलेल्या वाटेकडे कटाक्ष टाकताना…
डावीकडे रतनगड आणि तिकडून व्हरपडी गावाला येणारी वाट !!! |
आम्ही नुकतीच केलेली हि वाट आता गिर्यारोहकांसाठी मोकळी झालेली आहे,
त्यामुळे आता तरी कोकण दरवाजा गुदमरून गेलेल्या श्वासातून मुक्त होईल आणि
स्वतंत्र श्वास घेईल कारण आता त्याच्या पण अंगाखांद्यावर गिर्यारोहक खेळतील
आणि मनसोक्त आनंद घेतील…
 |
व्हरपडी गावातून दिसणारे विहंगम दृश्य !!!
डावीकडून रतनगड, कात्राबाई, करंडा घाट, गुहीरीचे दार आणि आजोबा पर्वत
|
Mast narration, Hope the route info and maps helped you find the route :)
ReplyDeleteYes offcourse....it helps a lot in whole route truly.
DeleteThanks...thanks a lot
This comment has been removed by the author.
ReplyDelete